लेले कुलधारक सदस्यांना नमस्कार,

जगात सर्वत्र विखुरलेल्या साधारण 40 लेले घराण्यांची एक संघटना असावी या विचाराने लेले हितवर्धक मंडळाची स्थापना करण्यात आली. लेले कुलवृत्तांत प्रसारीत करणे, काही ठोस कार्यक्रम राबवणे हे मंडळाचे उद्दीष्ट आहे. आपल्या लेले मंडळींची कोकणात किंवा भारतात अन्यत्र रिकामी घरे बंद अवस्थेत आहेत. व्याप आणि भानगडी नकोत म्हणुन ती आपण भाड्याने देत नाही, पण दहा पंधरा दिवसांकरता लेले मंडळींना माफक आणि योग्य दराने देण्यास काही अडचण नसावी. घर वापरात राहुन थोडे उत्पन्न मिळू शकते. या आणि अशा प्रकारच्या योजना राबवता येतील. आज रोजी लेले कुलनाम धारक अनेक क्षेत्रात उच्च पदांवर कार्यरत आहेत. जसे LIC, Income Tax, Mantralay, Railways, Banks, RTO, Hospitals, इत्यादी. जर आपल्याकडे अशा उच्चपदस्थ लेले मंडळीची माहिती असेल तर आपली कामे करताना व्यवस्थित मार्गदर्शन आणि सहयोग मिळेल. कळपात राहणे उत्तम.

मंडळाची आजीव सभासद वर्गणी 1000/- असावी असे ठरविण्यात आले आहे. यापुर्वी अनेकांनी सभासद होण्याकरता 500/-, 250/- जमा केले आहेत. नियमाप्रमाणे प्रत्येक सभासद हा वेगळा असल्याने सहसभासद, अशा प्रकारची वर्गवारी आता करता येणार नाही. मंडळाचे कार्यक्रमांना सर्व लेले कुटुंबीयांचे स्वागत असले तरी मंडळाचे आजीव सभासद होणे हे जरुरीचे आहे. यापुर्वी आपण काही रक्कम जमा केली असल्यास उर्वरित रक्कम पाठवुन मंडळाचे आजीव सभासद व्हावे ही नम्र विनंती.
धन्यवाद
!
आपले नम्र

       कार्यवाह                                      कार्याध्यक्ष

श्रीकांत वसंत लेले, (मुंबई)       श्री भास्कर वामन लेले, (पुणे)

        9892159859                                9850085959

Forms Available bellow, requested to fill up & send
Family Information: Form1 (Image / .pdf) | Form2 (Image / .pdf) | Membership Form  (Image / .pdf)